वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर सुकर..

24 Jun 2019 , 06:06:25 PM

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत विधानसभेत अध्यादेशाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्याने मराठा विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन निर्णयामुळे २५० मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश धोक्यात आला होता. या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधःकारमय होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला होता. पक्षाच्या प्रयत्नांना विधेयक मंजुर झाल्याने यश आले आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची आरक्षणांतर्गत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या न्यायालयीन निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार  यांनी त्यांची आझाद मैदान येथे भेट घेतली होती. तसेच खा.सुप्रिया सुळे यांनीदेखील विद्यार्थ्य़ांची भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केलीहोती. पवार साहेबांनी या विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच प्रवेशाचा घोळ लवकर संपवावा व या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. त्यामुळे सरकारने याप्रश्नी सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम राखण्यासाठी अध्यादेश आणला होता आणि या अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर करून ते सभागृहात मंजूर केले. यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे मराठा विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे.

संबंधित लेख