पुलवामाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करणाऱ्या मोदी सरकारला शहीदांचा विसर, पुलवामा हल्ल्यातील शहीदांची कुटुंबं आजही मदतीच्या प्रतिक्षेत

19 Feb 2020 , 12:10:22 PM


पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४१ सीआरपीएफ जवानांच्या हौतात्म्याचे मोदी सरकारला काहीच मोल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झालेय. शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. या शहीदांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने मदत जाहीर केली. मात्र ही मदत फक्त घोषणांपुरता होती, हे विदारक वास्तव समोर आलेय. जाहीर करण्यात आलेली मदत या कुटुंबीयांना अद्याप मिळालेली नाही. तसेच, प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनीही केली होती. मात्र, शासनाच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे नसल्याने दिलेले दिलेले धनादेश बाउन्स होतील म्हणून परत घेण्याची नामुष्की फडणवीस सरकारवर ओढवली होती. राजकीय हव्यासापोटी भाजपने निवडणूक प्रचार मोहिमेतून पुलवामा घटनेचा उपयोग केला. जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांची सरकार काळजी घेईल, शासनातर्फे त्यांना पाच एकर जमिनीसह इतर मदत केली जाईल, अशा विविध घोषणा केल्या गेल्या. पण प्रत्यक्षात या घटनेला वर्ष उलटून गेलं तरी घोषणांची पूर्तता झालेली नाही.. शहीदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी हेलपाटे घालण्याखेरीज दुसरे काहीच हाती लागले नाही, पदरी पडले फक्त दु:ख आणि निराशा....

संबंधित लेख