मोदीजी भिंत बांधण्याआधी जरा इकडे बघा, ट्रम्प यांनी भारत देशालाच गरीबीत काढलेय, विकसनशील देशांच्या यादीतून भारत बाहेर.

19 Feb 2020 , 12:26:21 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अहमदाबादलाही भेट देणार असल्याने तिथल्या झोपड्या लपवण्यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे... पण, अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा... गरिबी झाकण्याची आता गरज नाही, कारण, ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळले असून अक्षरशः गरिबीत काढले आहे. त्यामुळे आता भारताला अमेरिकन करांतून निर्यातीत सूट मिळणार नाही. भारत, चीन आणि दक्षिण कोरिया जागतिक व्यापार संघटनेच्या सवलतींचा गैरफायदा घेत असून त्याचा फटका अमेरिकेला बसत असल्याचा बहाणा अमेरिकेच्या प्रशासनाने केला आहे. विकासदर आधीच खालावलेला असताना, ५ ट्रिलीयन डॉलरच्या स्वप्नांना सुरूंग लागलेला असताना, आता भारतासाठी हा अमेरिकेचा मजबूत झटका आहे.

संबंधित लेख