केंद्राला इंटरनेटचेही वावडे?? म्हणे इंटरनेट मूलभूत हक्क नाही, माहिती आणि प्रसारणमंत्र्यांचा जावईशोध.

19 Feb 2020 , 02:43:40 PM

.

इंटरनेट हा कुणाचाही मूलभूत हक्क होऊ शकत नाही, असं वक्तव्य केलं आहे माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी... इंटरनेटचा वापर आणि मतस्वातंत्र्य हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असा निर्वाळा दस्तुरखूद्द सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही मंत्रीमहोदय असे दावे करत आहेत हे विशेष.. काश्मीरमधील इंटरनेट बंदीनंतर न्यायालयाने सरकारचे कान टोचले होते. पण इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार असल्याचा निव्वळ गैरसमज आहे, असे विधान करत रवीशंकर प्रसाद न्यायालयाचाही अवमान करत आहेत. लोकांच्या अधिकारांवर गदा आणण्याच्या या केंद्र सरकारच्या प्रयत्नावर देशभरातून मात्र संताप व्यक्त होतोय.

संबंधित लेख