अब की बार, ७२ घोटाळेबाज फरार, परराष्ट्र मंत्रालयाची लोकसभेत कबुली

19 Feb 2020 , 02:51:34 PM

मोदी सरकारच्या राजवटीत आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून गेलेल्या भारतीय उद्योजकांची यादी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या नसतील तरच नवल! कारण, २०१५ सालानंतर तब्बल ७२ घोटाळेबाज परदेशात पळून गेल्याची कबुली परराष्ट्र मंत्रालयाने लोकसभेत दिली आहे. नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चोकसी, ललित मोदी यांच्यासारखे तब्बल ७२ उद्योजक मोदी सरकारच्या कृपेमुळे मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. हे आरोपी देशात वास्तव्यास आहेत की नाही याचा तपास सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट होतेय.

संबंधित लेख