‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आंध्रप्रदेशात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री,पोलिस महासंचालकांची भेट घेणार

20 Feb 2020 , 03:39:57 PM


महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना चाप बसवण्यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यात येणार आहे. राज्य शासन त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून याबाबत आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्रप्रदेशात दाखल झाले आहे. विजयवाडा येथे गृहमंत्री आणि शिष्टमंडळाचे स्वागत आंध्रप्रदेशचे अपर पोलिस महासंचालक ए.रविशंकर यांनी केले. हिंगणघाट येथील जळीतकांडानंतर अवघा महाराष्ट्र पेटून उठला. महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घेत राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. हे शिष्टमंडळ आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनरेड्डी, गृहमंत्री मेकाथोटी सुचारिथा यांच्यासह आंध्रचे पोलिस महासंचालक यांच्यासोबत दिशा कायद्याबाबत चर्चा करणार आहे. शिष्टमंडळात गृहमंत्र्यांसोबत अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अश्वती दोरजे या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

संबंधित लेख