राज्याचे माजी गृहमंत्री कै.आर.आर.पाटील यांच्या ‘प्रथम पुण्यस्मरण’ दिना निमित्त अंजनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

14 Feb 2016 , 03:25:57 PM

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अशा अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करणारे, आधुनिक ग्रामीण महाराष्ट्राचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.आर.आर.पाटील यांच्या ‘प्रथम पुण्यस्मरण’ दिना निमित्त, दि.16 फेब्रुवारी 2016 रोजी तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या मुळ गावी आदरांजलीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी अंजनीस उपस्थित राहणार आहेत.

कै.आर.आर.पाटील यांना आदराजंली वाहण्यासाठी दि.16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता अंजनी येथे सर्वधर्मिय प्रार्थना होणार आहे. यानंतर 9 वाजता भजनाचा कार्यक्रम, 10.10 वाजता पुष्पाजंली कार्यक्रम तर सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांची श्रद्धांजलीपर मनोगते होणार आहेत. यावेळी उपस्थित राहून लोकांनी आपल्या लाडक्या नेत्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील व भगिरथी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्मिता पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख