राज्यातील कायम विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना लवकरात लवकर अनुदान द्यावे

16 Mar 2020 , 03:32:49 PMमहाराष्ट्रातील कायम विनाअनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत केली.

राज्याच्या आणि दिल्लीतील एनसीटीच्या मान्यतेने शारीरिक शिक्षण महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. १९९४ पासून राज्यात पहिला क्रमांकाचे खेळाडू निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय न करता दुजाभाव करण्यात येत आहे. या महाविद्यालयांच्यापाठून मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांना मागच्या सरकारने अनुदान दिले आहे असा आरोपही आमदार प्रकाश गजभिये यांनी केला.

हायकोर्टात निर्णय देवूनही राज्यातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना न्याय देण्यात आलेला नाही. त्यांना अनुदानावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे जे खेळाडू निर्माण करण्याचे काम करणारे राज्यातील ५२ शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांाना अधिवेशन संपण्याअगोदर न्याय मिळाला पाहिजे. हायकोर्टाच्या निर्णयानुसार जी याचिका दाखल केली आहे याची आठवण करून देताना आमच्या महाविकास आघाडी सरकारने आजच अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

दरम्यान उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्यासोबत बैठक घेतली जाईल. हायकोर्टात याचिका दाखल आहे. कोर्टाने जे निर्देश दिले आहेत ते तपासले जातील. सरकारने काय प्रतिज्ञापत्र केले आहे हेही तपासले जातील आणि सकारात्मक विचार करुन आजच बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

संबंधित लेख