शहरातील जिम, स्विमिंग पूल आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश

16 Mar 2020 , 03:36:31 PM


राज्यात कोरोना विषाणूचे बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली असून पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १० वी १२ वी परीक्षा मात्र सुरू राहतील. याशिवाय आज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाण्यातील जिम, स्विमिंग पूल आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना आजाराचा प्रसार टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी देण्याबाबत खासगी कंपन्यांच्या मालकांना विनंती करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधान परिषदेत दिली

संबंधित लेख