शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज विधानसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारतोय...

16 Mar 2020 , 04:11:32 PM


माननीय नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड करण्यासाठी विरोधकांनी मनाचा मोठेपणा दाखवला, तसेच सर्व विधानसभा सदस्यांचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आभार मानले. झिरवाळ आमदार म्हणून निवडून आलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल अशा दिंडोरी मतदरसंघातील जनतेचेही त्य़ांनी आभार मानले. झिरवाळ यांचे काम आम्ही समोरून पाहिले आहे. शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद आहे. राज्यतील जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमकपणे मांडले गेले पाहिजेच. ते सोडवण्याची धमक झिरवाळ यांच्यामध्ये आहे, असे उद्गार अजितदादांनी काढले.

१९८४ मध्ये झिरवाळ साहेब तहसील कार्यालयात क्लार्क होते, पण त्यांनी ही नोकरी सोडली. पुढे त्यांनी बिगरीचे काम केले. त्यामुळे त्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. पुढे महाले साहेबांच्या सोबत राजकारणाच्या प्रवाहात त्यांनी उडी मारली. तळागाळातील लोकांसाठी काम करणारे, लोकांच्या भावनांशी एकरूप होणारे असे हे आपले सहकारी आहेत. पदभार स्वीकारल्यावरही ते असेच राहतील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

संबंधित लेख