पुढील तीन महिन्यांमध्ये सर्व कारागृहांमध्ये सीसीटीव्ही बसवणार

16 Mar 2020 , 04:46:17 PM


राज्यातील कारागृह वस्तू दक्षता प्रतिबंधक विभागाच्या पाहणीत अनेक कैद्यांकडे मोबाईलपासून अंमली पदार्थांपर्यंत अनेक प्रतिबंधित वस्तू आढळून येतात. यावर कोणती कारवाई करण्यात येणार का असा प्रश्न विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला काही सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना राज्यातील कारागृहात कैद्यांना प्रतिबंधित वस्तूचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढील तीन महिन्यांमध्ये सर्व कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार, अशी माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी दिली. यापुढे प्रतिबंधित वस्तू कारगृहात सापडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख