महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची प्रत्येक समाज घटकाला साथ, ज्येष्ठ नागरिकांच्या मदत निधीमध्ये दुप्पट वाढ

16 Mar 2020 , 04:53:33 PM

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मदत निधी मासिक एक हजार रूपयांवरुन दोन हजार रूपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. तसेच मागील पाच वर्षांत बंद झालेली संजय गांधी निराधार पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरुन ५० हजार रुपये करण्याचे शासनाने योजले आहे. शिवाय महापूरग्रस्त महिलांनी खासगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज आणि मायक्रो फायनान्स माफ करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक समाज घटकाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे, हे पुनश्च सिद्ध झालंय.

संबंधित लेख