पंतप्रधान मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेला देशोधडीला लावले..

16 Mar 2020 , 04:57:28 PM


अर्थसंकल्पातून निराशा, शेअर बाजारात घसरण, कोरोनाचा हैदोस...
आणि आता जागतिक सतरावर रूपयाही गडगडला...

येस बँकेवरील संकट, कोरोना व्हायरसचे संकट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ अशा तिहेरी संकटाने शेअर बाजाराला चांगलाच दणका दिलाय. आधीच केंद्रीय अर्थसंकल्पातून भारतीयांची निराशा झालेली असताना आता रुपयाही गडगडला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना रुपया ७३.७८ वर स्थिरावला होता. त्याच्या दोनच दिवसांनंतर ७४.१० प्रती डॉलर इतक्या निचांकी स्तरावर घसरला असून मोदी सरकारने भारताच्या अर्थव्यवस्थेची पुरती वाट लावली, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अर्थतज्ज्ञांनीही मोदी सरकारच्या राजकीय आणि अर्थनीतीला यासाठी धारेवर धरले आहे. आता जागतिक स्तरावर रूपयाची झालेली सर्वाधिक घसरण देशाला अधिक चिंतेत टाकणार आहे.

संबंधित लेख