राज्यातील रस्ते अपघातात दहा टक्क्यांनी घट

16 Mar 2020 , 05:11:42 PM


गेल्या वर्षभरात रस्ते अपघातात दहा टक्क्यांनी घट झाल्याची माहिती गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज एका लेखी उत्तरात दिली. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये रस्ते अपघातात दहा टक्क्यांनी घट झाल्याचे ते म्हणाले. जानेवारी ते सप्टेंबर या काळात राज्यात २४ हजार २६२ रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये ७ हजार ३१० लोकांचा मृत्यू झाल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वेग मर्यादेचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे, असंही गृहमंत्र्यांनी यांनी सांगितलं. रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रामुख्याने रस्ते क्रॅश अॅनलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तर वेगाचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईसाठी स्पीड डिटेक्टर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षे संदर्भात सरकारकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख