कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती

02 Jul 2020 , 04:31:42 AM


राज्यातील कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी दिली. विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. १८ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अद्यापही कोरोनाचा आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत असल्याने अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क मधील तरतुदीनुसार मा. उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी संगितले.

संबंधित लेख