राष्ट्रवादी मुंबई विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांचा आवाज सर्वदूर पोहोचवण्यासाठी 'बिनधास्त बोल' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

02 Jul 2020 , 04:33:49 AM


कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विरोधक क्षुद्र राजकारणापायी परीक्षा घेण्याचा आपला दुराग्रह व अट्टहास कायम ठेवत आहेत.
ह्या चक्रव्यूहात अडकलेला एक विद्यार्थी आणि पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? कोरोनाच्या संकटात परीक्षा व्हावी की नको याबाबत तुमचं काय मत आहे? तुमचा आक्रोश, तुमचा असंतोष हे आपण पत्राद्वारे कमीत कमी शब्दात किंवा ३० सेकंद ते २ मिनिटांच्या एका व्हिडीओ मधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पर्यंत पोहोचवा. आम्ही आपले हे व्हिडीओ एकत्रितपणे कुलाधिपतींकडे पोहोचवून विद्यार्थी आणि पालकांची भूमिका त्यांच्या निदर्शनास आणून देऊ.
आपण आपले व्हिडीओ रविवार, दिनांक २१ जूनपर्यंत खालील क्रमांकांवर व्हाट्सॲप करा किंवा खालील ई-मेल आयडी वर मेल करा. व्हिडीओ 2 मिनिटांपेक्षा अधिक नसावा याची नोंद घ्यावी.
ई-मेल: bolabindas.nsc@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क
Adv.अमोल मातेले - (9892411498)
अमोल हिरे - (9082072090)
स्नेहल कांबळे - (7262883090)
इम्रान तडवी-
(9870626465)
अमित गुप्ता - (9821757668)
Adv.ज्ञानेश्वर गावडे - (8976618004)

संबंधित लेख