सामाजिक बांधिलकीचा जपूया वारसा देऊन निसर्ग चक्रीवादळ बाधितांना मदतीचा हात..

02 Jul 2020 , 04:35:36 AM


निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शेतीचे, घरांचे, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी, कोळी बांधव, कष्टकरी, तसेच छोट्या उद्योजक नुकसामानुळे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांना वस्तू, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनतेला करण्यात येत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी हे आवाहन केले आहे.
राज्यशासनातर्फे १०० कोटींची मदत याआधीच कोकणातील नुकसानग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या भागात मोफत धान्य व केरोसिनचे वाटपही करण्यात येत आहे. सर्व नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनातर्फे अधिक मदतही जाहीर करण्यात येईल. या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा उचलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावला आहे. पक्षाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत लोकांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका घेतली आहे. आताही निसर्ग चक्रीवादळ बाधितांच्या सहकार्यासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे.

संबंधित लेख