खाद्य सुरक्षा जनजागृती मोहीमेत मुंबई विभाग देशात अव्वल

12 Sep 2020 , 09:28:59 AM


अन्न पदार्थांची सुरक्षा राखली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, मुंबईतर्फे राबविण्यात आलेली जनजागृती मोहिम देशात अव्वल ठरली असून ही कामगिरी अत्यंत प्रशंसनीय आहे, असे कौतुक अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये पावसाळ्यातील खाद्य सुरक्षा या उपक्रमांतर्गत देशातील 30 शहरांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरांचा यात समावेश होता. यात मुंबई विभागाने ४५० गुण मिळवून देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण व नेट प्रो फॅन (NetProFan) यांच्यातर्फे मुंबई विभागास प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई विभाग आयुक्त अरुण उन्हाळे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली होती.

संबंधित लेख