जनता दरबार उपक्रमांतर्गत - राज्यमंत्री अदिती तटकरे

12 Sep 2020 , 09:41:13 AM

जनतेच्या समस्यांचे निवारण करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या जनता दरबार उपक्रमांतर्गत आज अंतिम सत्रात राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आ. शेखर निकम, आ. सुनील भुसारा, आ. अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते.

संबंधित लेख