जनतेच्या दरबारात उपक्रमांतर्गत आज सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे

12 Sep 2020 , 09:43:29 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सुरू केलेल्या मंत्री जनतेच्या दरबारात उपक्रमांतर्गत आज सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे हे आरोग्य खात्यासंबंधीत प्रश्न सोडवण्यासाठी प्रदेश कार्यालयात हजर होते. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना व जनतेला त्यांचे प्रश्न थेट आरोग्यमंत्र्यांकडे उपस्थित करण्याची संधी मिळाली. ना. राजेश टोपे यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आ. शेखर निकम, आ. सुनील भुसारा, आ. अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते.

संबंधित लेख