जनतेच्या दरबारात उपक्रमांतर्गत -उपमुख्यमंत्री ना. अजित पवार

12 Sep 2020 , 09:46:58 AM

आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राबवण्यात येत असलेल्या 'जनता दरबार' उपक्रमास जनतेचा खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे मुंबई प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित होते. मा. अजितदादांनी भेटीसाठी आलेल्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांचे निवारण केले.
यावेळी आ. शेखर निकम, आ. सुनील भुसारा, आ. अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई जिल्हाध्यक्ष सचिन नारकर, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते.

संबंधित लेख