मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रख्यात कलाकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

12 Sep 2020 , 09:50:27 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रख्यात कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांनी मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मा. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे आणि खा. सुप्रियाताई सुळे यांनीही त्यांना पक्षप्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या. विजय पाटकर, सविताताई मालपेकर, प्रियदर्शन जाधव, कौस्तुभ सावरकर, संतोष भांगरे, मायाताई जाधव, गिरीश परदेशी, उमेश बोळके, बाळकृष्ण शिंदे, डॉ. सुधीर निकम, श्याम राऊत, मोहित नारायणगावकर अशा अनेक नामवंतांनी राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचा सांस्कृतिक विभाग अधिक सशक्त झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलमध्ये प्रवेश केलेल्या कलाकारांची नियुक्ती..
१) विजय पाटकर: सिनेअभिनेते: मुंबई, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
२) सविताताई मालपेकर: सिनेअभिनेत्री: मुंबई, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस
३) प्रियदर्शन जाधव: सिनेअभिनेते दिग्दर्शक: ठाणे, अध्यक्ष ठाणे शहर
४) कौस्तुभ सावरकर: लेखक-दिग्दर्शक: ठाणे, उपाध्यक्ष ठाणे शहर
५) संतोष भांगरे: नृत्य दिग्दर्शक: ठाणे, सरचिटणीस ठाणे शहर
६) मायाताई जाधव: सिनेअभिनेत्री: पनवेल, अध्यक्ष- पनवेल शहर
७) गिरीश परदेशी: सिने अभिनेते: पुणे , सरचिटणीस पुणे जिल्हा
८) उमेश बोळके: सिनेअभिनेते: कोल्हापूर ,अध्यक्ष कोल्हापूर शहर
९) बाळकृष्ण शिंदे: सिनेअभिनेते: सातारा, अध्यक्ष- सातारा जिल्हा
१०) डॉ. सुधीर निकम - सिनेअभिनेते , लेखक दिगदर्शक - अध्यक्ष - मराठवाडा विभाग
११) श्याम राऊत - निर्माता , अध्यक्ष - लातूर जिल्हा
१२) मोहित नारायणगावकर- पुणे जिल्हा उपाध्यक्ष

संबंधित लेख