उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

30 Sep 2020 , 02:06:01 PM

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजता पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. त्यांनी पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो (वनाज), शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी करून मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली.
अजित पवार यांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास केला. शिवाजीनगर येथील बोगद्याचे काम, व्हील पार्क (वनाज) येथील कचरा डेपोचे अत्याधुनिक मेट्रो डेपोमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, येथील कामाचीही त्यांनी पाहणी केली. मेट्रोच्या रेणू गेरा यांनी या मेट्रो डेपो उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली.

संबंधित लेख