'जनता दरबार' उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार

01 Oct 2020 , 05:27:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर हे उपस्थित होते.

संबंधित लेख