राज्य सरकारकडून अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर

26 Oct 2020 , 12:27:05 PM


राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी 10 हजार कोटी रुपयांची मदत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, घर दुरुस्ती, शेती, पाणी पुरवठा व इतर नुकसान भरपाईचा यात समावेश आहे. दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्तांना ही मदत दिली जाईल. राज्य आर्थिक चणचणीत असले तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. अनेकदा विनंती करूनही अद्याप पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ना. ॲड. अनिल परब उपस्थित होते.

संबंधित लेख