राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला राज्यात तपास करता येणार नाही – ना. अनिल देशमुख

26 Oct 2020 , 12:29:09 PM


राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला राज्यात तपास करता येणार नाही, असा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विरोधक सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये यंत्रणेचा गैरवापर होत आहे, सीबीआयचा राजकीय गोष्टींसाठी वापर होतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्याच्या अधिकारांच्या रक्षणासाठी हा आदेश काढण्यात आल्याचे गृहमंत्री म्हणाले. असा कायदा पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राज्यस्थान या राज्यांमधअयेही राबवण्यात येत असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.