इंदापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी

26 Oct 2020 , 12:48:47 PM

पुणे जिल्हा आणि इंदापूर तालुक्यामध्ये बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणांमधून जवळपास 2 लाख क्यूसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले होते. या विसर्गाचा फटका नीरा व भीमा नदी संगमावरील नरसिंहपूर या गावाला बसला. गावामध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे तसेच घरांचे,शेतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत नरसिंहपूर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.