संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानाने सांगितलेल्या ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करत ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे

26 Oct 2020 , 12:58:26 PM

संविधानिक पदावर विराजमान असतानाही संविधानाने सांगितलेल्या ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करत ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राज्यपालांना संविधानाची प्रत तसेच प्रस्तावना पोस्टाने पाठवून निषेध नोंदवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ठाणे शहराच्या मुख्य टपाल कार्यालयात एकत्र येत ‘संविधानाचा विजय असो’, अशा घोषणा देऊन राज्यपालांना संविधानाची प्रत स्पीड पोस्टद्वारे पाठवली. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आम्ही भारतीय संविधान सविनय सादर करीत आहोत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल म्हणूनच आम्ही भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना त्यांना पाठवत आहोत, असे आनंद परांजपे यावेळी म्हणाले.
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्ष सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कैलास हावळे, सरचिटणीस रवींद्र पालव, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, निलेश फडतरे, निलेश कदम, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष राजू चापले, वॉर्ड अध्यक्ष संतोष घोणे, दिनेश सोनकांबळे, समाधान माने, युवक पदाधिकारी सौरभ वर्तक, रोहित भंडारी, महिला पदाधिकारी माधुरी सोनार, ज्योती निंबर्गी, माया केसरकर, सोमा दे, नंदिनी चंदनशिव यांनी सहभाग घेतला.

संबंधित लेख