खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

07 Nov 2020 , 12:35:02 PM

वंचित बहुजन आघाडीतील गणेश जाधव, सुधीर आब्रे, ज्योती कांबळे, प्रकाश यादव, दीपक तांबे, रेखा मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज खा. सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागात ते कार्य करणार आहेत.
तसेच यावेळी चांदणी मुन्नी अन्सारी यांनी पक्षाच्या एलजिबीटी सेलमध्ये प्रवेश केला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, माजी नगरसेवक अजित रावराणे, सामाजिक न्याय विभाग मुंबई निरीक्षक जोतिराम सोनवणे उपस्थित होते.

संबंधित लेख