फडणवीस सरकारला शिवाजी महाराजांचा विसर – नवाब मलिक

19 Feb 2016 , 02:59:49 PM

निवडणूक काळात मतदारांना भुलविण्यासाठी ‘शिवछत्रपती का आशीर्वाद; चलो चले मोदी के साथ’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारला आज शिवजयंतीला मात्र महाराजांचा सोयीस्कररीत्या विसर पडला असून आज एकाही वृत्तपत्रातून शिवजयंतीची जाहिरात करण्यात आलेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. 

एकीकडे ‘मेक इन इंडिया’च्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या सरकारकडे शिवजयंतीसाठी पैसा शिल्लक नसणे, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मलिक यांनी केली आहे.

 तसेच शिवस्मारकाच्या बाबतीत देखील सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचाही मलिक यांनी पुनरुच्चार केला. मागील वर्षी शिवजयंतीला शिवस्मारकाचे भूमिपूजन करणार, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अद्याप शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. 

निवडणूक काळात उठता-बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपा सरकारमधील नेत्यांना निवडणुका संपल्यानंतर शिवाजी महाराजांचा विसर पडला असल्याचीही टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

संबंधित लेख