राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे औरंगाबाद येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

22 Feb 2016 , 04:09:12 PM


औरंगाबाद येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी मिळावी या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क माफी मिळत नाही तो पर्यंत मराठवाड्यात साखळी उपोषण केले जाईल असा इशारा संग्राम कोते पाटील यांनी दिला आहे.

संपूर्ण शुल्क माफीबरोबरच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह शुल्क माफ करावे, अशी मागणी संग्राम कोते पाटील यांनी यावेळी केली. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. या उपोषणात औरंगाबादमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल तायडे यांच्यासह ऋषिकेश देशमुख, अमोल दंडगे, संदीप फजगे, आशुतोष चव्हाण,सारंग बोराडे, सागर शेलार,अशफ़ाक अली,अक्षय पाटिल,सुमित शिंदे, अक्षय गोरे,बबलू आंधारे,आकाश सुरडकर,अजय विश्वकर्मा,सुशिल बोर्डे,प्रशांत चौधरी,मोहित जाधव, दीपक चौहान या उपोषणास उपस्थित होते.
 
दरम्यान, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी येत्या काही दिवसात मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याअंतर्गत येत्या 25 फेब्रुवारीला धुळे येथे, 26 फेब्रुवारी रोजी सोलापूर विद्यापीठासमोर तर ५ र्चला कोल्हापूर येथे आंदोलन केले जाणार आहे.

संबंधित लेख