पुणे महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांची निवड 

25 Feb 2016 , 09:43:18 PM

पुणे महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी बाजी मारली आहे. त्यांनी ८४ मते मिळवत भाजपच्या अशोक इनपूरे यांचा पराभव केला. त्यांना केवळ २५ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सचिन भगत यांना ११ मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मनसेने तटस्थ भूमिका घेतली होती. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुकारी अलगूडे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने या निवडणुकीत विजय मिळवला. 

संबंधित लेख