'आधी बोलण्यावर बंदी आता खाण्यावर बंदी, हेच का भाजपचे अच्छे दिन' सचिन अहिर यांचा भाजपला संतप्त सवाल

23 Oct 2015 , 11:21:00 AM

मुंबई : ९ सप्टेंबर - आधी राजकीय नेत्यांविरोधात बोलण्यावर बंदी आणि आता सर्वसामान्यांच्या मांसाहारावरही निर्बंध लावणाऱ्या भाजपचे "अच्छे दिन' हेच आहेत का? असा संतप्त सवालराष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी केला आहे. पर्युषण पर्वादरम्यान मुंबई महापालिकेने लादलेल्या चार दिवसांच्या मांस विक्रीनिर्णयाविरोधातल्या निषेध मोर्चात ते बोलत होते. या निषेध मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर अलका केरकर यांना कोंबड्या आणि सुकी मच्छी देत अनोख्यापद्धतीने आपला निषेध नोंदवला.

बुधवारी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर मा. अहिर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील सर्वनगरसेवक आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मा. अहिर म्हणाले की, राज्य सरकारने फक्त पर्युषण पर्वाचा पहिला दिवसआणि शेवटचा दिवस असे दोन दिवस शहरातल कत्तलखाने बंद करण्याची मुभा दिलेली असतानाही महापालिकेने भाजपचा अनुनय करत आपल्या अधिकारात दिलेलीआणखी दोन दिवसांची मांस विक्रीसाठीची मुदत वाढ अन्यायकारक आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आहोत.
उच्च न्यायालयाचे निर्देश भाजपला मान्य नाहीत का? -  सचिन अहिर

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने आपला धर्म आपल्या घरापुरताच मर्यादीत ठेवा, तो रस्त्यावर आणू नका असे आदेश एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिले होते. मगसंस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या भाजपला उच्च न्यायालयाचे हे निर्देश मान्य नाहीत का? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे. आपल्या धर्माच्या सणादरम्यान इतरधर्मियांनीही मांसाहार करू नये हा अट्टहास कितपत योग्य आहे, असा सवालही  अहिर यांनी केला.

संबंधित लेख