राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शुल्कमाफी

26 Feb 2016 , 12:03:28 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्कमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात जोरदार आंदोलने करण्यात आली होती. त्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.  संग्राम कोते पाटील यांनी राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने लावून धरली होती. त्यासाठी लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते. शिवाय कुलगुरूंना भेटून निवेदनही देण्यात आले. मात्र कुलगुरूंनी योग्य प्रतिसाद न देता विद्यार्थ्यांचाच अवमान केला. यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे मराठवाड्यात आंदोलनांचे स्वरुप अधिक तीव्र करण्यात आले. शेवटी विद्यापीठ प्रशासनाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलनांपुढे झुकून अखेर परिक्षा शुल्कमाफीचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

संबंधित लेख