राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी मोर्चा

26 Feb 2016 , 03:39:42 PM

उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाची झळ बसत आहे. या भागातील दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळावी ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सातत्याने लावून धरली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्कमाफी मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संग्राम कोते पाटील यांनी सादर केले. यावेळी त्यांच्यासह विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष मयुर ठाकरे, शहराध्यक्ष संदीप बेडसे हेदेखील उपस्थित होते.


संबंधित लेख