ऊसतोडणी कामगारांच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे - शरद पवार

24 Oct 2015 , 09:31:38 AM

विरोधी पक्षनेते Dhananjay Munde यांच्या पुढाकाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज ऊस तोडणी मजूर व मुकादमांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात वीस टक्के वाढ, मुकादमांचे कमिशन, वाहतुक दर, ऊस तोडणी कामगारांच्या फरक बिल इत्यादी प्रलंबित मागण्या घेऊन ऊसतोडणी मजूर संघटनांच्या प्रतिनिधींनी पवार यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या तात्काळ सोडवाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी साखर संघासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन हे प्रश्न सोडवावेत अशी सूचना शरद पवार यांनी केली.
यावेळी पवार यांनी ऊस तोडणी कामगारांचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना मुंडे आणि आपण गेल्या अनेक वर्षापासून ऊस तोडणी कामगार, मजूर आणि साखर व्यवसायात येणाऱ्या अडचणी एकत्र बसून सोडवल्या. त्यामुळे आम्हाला कधीही अडचण आली नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी पुढाकार घेऊन ऊस तोडणी मजुरांचे प्रश्न सोडवावेत, चर्चेसाठी त्यांच्यासोबत बसण्याची तयारी असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषद विरोधी पक्षनेता म्हणून ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूक ठेकेदार यासर्वांच्या वतीने स्वतः मुख्यमंत्र्यांना आदरणीय पवार साहेबांसोबत चर्चा करून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने या प्रसंगी आपल्या मागण्यांचे निवदेन शरद पवार यांना दिले.⁠⁠

संबंधित लेख