चिथावणीखोर भाषणाबद्दल राज ठाकरे यांच्या गुन्हा नोंदवा- नवाब मलिक

10 Mar 2016 , 02:54:28 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १० व्या वर्धापन दिनी आपल्या भाषणात तरुणांना नव्या रिक्षांची जाळपोळ करण्याची चिथावणी देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.


राज ठाकरे यांनी काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीने चिथावणीखोर भाषणे करुन सर्वसामान्य मराठी तरुणांची माथी भडकावली होती. त्यामुळे मुंबईसह अन्य ठिकाणी परप्रांतीय तरुणांना मारहाण तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. परिणामी, अनेक सर्वसामान्य घरातील तरुणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद झाले होते. या प्रकरणातील युवकांना राज ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडले होते. 

आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी रिक्षा परमिट वाटपाच्या मुद्द्यावर रिक्षा जाळपोळीची भाषा सुरू केली आहे. अशा पद्धतीने चिथावणीखोर भाषण करणे गुन्हा असल्यामुळे सरकारने तात्काळ राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख