राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश - सुनील तटकरे

24 Oct 2015 , 09:54:27 AM

मुंबई - राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या आठ महिन्यांत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. 
मुंबईच्या मालवणी भागातील विषारी दारूचे १०४ बळी, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे बलात्कार पिडीत मुलीवर दुसऱ्यांदा बलात्कार होण्याची गंभीर घटना, साकीनाका भागातील मॉडेलवर झालेल्या बलात्कारात पोलिसांचाच सहभाग त्यामुळे या राज्याचे रक्षकच भक्षक बनत चालले आहेत.
गृहमंत्रीपदावर असताना दिवगंत आर.आर.पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्यातील माता-भगिनीचे संसार उध्वस्त होऊ नये. याकरिता डान्सबार बंदी केली होती, सध्या मात्र हे डान्सबार खुलेआम सुरु असल्याचे दिसत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने महिला पत्रकारही आता हल्ले होऊ लागले आहेत.
गेल्या आठ महिन्यांत २३९४ मुलांच्या अपहरणाची प्रकरणे तर ५२५० महिलांच्या विनयभंग, बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. आज राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राज्यातील या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल सत्ताधारी मंत्रीच गृहमंत्र्याचा वचक नसल्याची टीका करीत आहे.
आम्ही जात्यात अन् तुम्ही सुपात... हे दिवसही बदलतील
सध्या सरकारमधील भाजपा मंत्र्याचा चिक्की घोटाळा, बोगस डिग्री प्रकरण, अग्निशमन यंत्रे खरेदी घोटाळा, आदिवासी मुलांचे पोषण आहार भ्रष्टाचार, शेतकऱी कडबाकुट्टीची यंत्रे खरेदीतील भ्रष्टाचारा सारखी रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.
१९५२-२०११ पर्यंत एकूण सिंचनावर झालेला खर्च ७०,००० कोटी रुपये इतका आहे. मग ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होऊच कसा शकतो. पण त्यावेळेचे विरोधी मंडळी व आत्ताचे सत्ताधारी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करत राहिले. आज त्यांच्यावर होत असलेले आरोपांमुळे ही मंडळी तणावाखाली आल्याचे सांगत आहेत. आज आम्ही जात्यात आहोत, तर तुम्ही सुपात, नव्हे टोपलीत आहात हे आपण लक्षात घ्या. पण हेही दिवस लवकरच बदलतील...!!!

मुंबई महापालिकेचेही लेखापरिक्षण करा
नालेसफाईच्या कामांवर महापालिकेच्या वतीने हजारो कोटी रुपये खर्चून देखील पावसाळ्यात शहरात पाणी तुंबल्याने मुंबईकरांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पावसाळ्यापुर्वी महापालिकेतील सत्ताधारी नालेसफाई कामासंदर्भात फोटोसेशन करतात.

भाजपा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस कदापीही सत्तेत सहभागी होणार नाही.
राज्यात राष्ट्रपती लागवट लागू नये यासाठी स्थिर सरकार स्थापन व्हावे म्हणून आम्ही भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र गेल्या सात-आठ महिन्यात राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात, शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यात, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे सरकार अपयशी ठरले असून आता या भाजपा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जाणीवपुर्वक सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत कदापी सहभागी होणार नाही.


संबंधित लेख