फर्ग्युसनची सत्यता पडताळून कारवाई करा

26 Mar 2016 , 01:05:36 AM

पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह घोषणा केल्याच्या कारणावरून सदर कॉलेजच्या प्राचार्यांनी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे, हे वृत्त समजताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी सदर घटनेची संपूर्ण माहिती घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच निवेदनाच्या माध्यमातून सदर घटनेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचे गैरवर्तन केलेले नसून त्यांच्यावर केलेली कारवाई थांबवावी आणि संबंधित प्राचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही निरपराध विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार नाही, असे ठामपणे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख