जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही - सुप्रिया सुळे

29 Mar 2016 , 06:50:19 PM

एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी गणेश पाण्डेला पाठिशी घालावं ही दुर्दैवी बाब असल्याची टीका आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हा केवळ पक्षाचा प्रश्न नाही. एका महिलेशी एक पुरुष वाईट वागतोय, याची नोंद समाजाने घेतली पाहिजे. तिच्याबद्दल अतिशय घाणेरड्या पातळीवर वर्तणूक केली गेली. इतकी की मी असा विचारच करू शकत नाही. अशी गोष्ट आमच्या पक्षात घडली असती तर मी उघडपणे त्याचा निषेध केला असता. आणि इतरत्र जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मी नेहमीच याचा निषेध करत आले आहे. ही घटना दुर्दैवी आहे. महिला सबलीकरणाबद्दल यांच्या संघटनेत कुठल्या भाषेत बोलतात हे अनेकदा दिसून आलेलं आहे. त्याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. असं सुप्रिया सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर निक्षून सांगितलं.

संबंधित लेख