राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा आशिष शेलार यांच्या कार्यालयाला घेराव

29 Mar 2016 , 07:30:18 PM

महिला विनयभंग प्रकरणी गणेश पाण्डे याला अभय देणारे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. पाण्डेविरोधात तक्रार दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. या आंदोलनाची माहिती असल्याने बिथरलेले भाजप कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. त्यांनी आपल्या नेत्याचा घोषणाबाजी करून बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी तणावाचे वातावरण झाले होते. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची बाजू घेत राष्ट्रवादी महिलांशी अशोभनीय भाषेत हुज्जत घातली व सर्व महिलांना ताब्यात घेतले.

संबंधित लेख