महानगरपालिकेचे काम पारदर्शी पद्धतीने चालते मग दरवर्षी नालेसफाई होऊनही पाणी कसे तुंबते? - जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

24 Oct 2015 , 10:02:50 AM

मुंबई - मुंबई महापालिकेचे काम अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी पद्धतीने चालते हे मला माहीत आहे, मात्र नालेसफाईच्या बाबतीत आपण समाधानी आहात का, शिवसेनेवर टीकेचा रोख धरून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याना प्रश्न केला.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माजी महापौर सुनील प्रभू सांगतात त्याप्रमाणे महानगरपालिकेचे काम पारदर्शी पद्धतीने चालते. मग दरवर्षी नालेसफाई होऊनही पाणी कसे तुंबते? आपण समाधानी आहात का? असा मुख्यमंत्र्यानाच थेट सवाल त्यांनी विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी हे माझ्या ‘स्कोप’ मध्ये येत नसल्याचे सांगितले.
लक्षवेधी प्रश्नाचे उत्तर व्याप्तीबाहेरचे आहे म्हणून त्यांनी तिरकसपणे दुसरा प्रश्न विचारला की, नालेसफाईची कामे यापुढे मंत्रालयातील मंत्र्याचे सचिवांमार्फत घेणार का, या प्रश्नाचे उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केले जाणार नाही. पण कोणी आरोपी आढळल्यास चौकशी करू. यावर जयंत पाटील यांनी खोचकपणे विचारले की, आपण चौकशी करू म्हणता पण आपल्याकडे चौकशी करण्याची ताकद आहे का? यावर हसत हसतच सगळ्या चौकशी करण्याची ताकद आहे, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.

संबंधित लेख