शनी शिंगणापूर येथील स्थानिक महिलांच्या विनंतीस मान देण्याची भूमिका - चित्रा वाघ

02 Apr 2016 , 06:49:20 PM

शनी शिंगणापूर येथील महिलांनी केलेली विनंती, मंदीर ट्रस्टींशी चर्चा आणि कायदा व सुव्यस्थेचा निर्माण होणारा प्रश्न लक्षात घेता राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनी मंदीरातील महिला प्रवेश पुढे ढकलला आहे. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये पुरूषांप्रमाणे महिलांना समान प्रवेश मिळेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाबाबत चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले. पण स्थानिक महिलांनी न्यायालाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो पण त्या निर्णयाची प्रत हाती येवू द्या, अशी विनंती चित्रा वाघ यांना केली. महिलांना आत्तापर्यंत प्रवेश नव्हता, त्या मानसिकतेतून बाहेर येण्यास थोडा वेळ लागेल तो वेळ द्या, अशीही विनंती या महिलांनी केली. महिलांनी दर्शनासाठी यावे पण सन्मानाने यावे, आम्ही त्यांचे स्वागत करु, असे स्थानिक महिलांनी सांगितले. स्थानिक महिलांच्या विनंतीला मान देऊन आणि गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, मंदीर प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.

संबंधित लेख