सरकार विरोधात जयंत पाटील यांचे विधान भवनात उपोषण

12 Apr 2016 , 12:31:14 AM

आमदारांना होणारी मारहाण, प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, औचित्याचे मुद्दे बाजूला ठेवून विधेयके सभागृहात मांडण्यात आली. त्या विधेयकांवर बोलूही दिले नाही. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेविरुद्ध विधान भवनात उपोषण सुरू केले.
आपल्याला बोलायला दिले जावे, अशी मागणी जोरदारपणे त्यांनी केली. या वेळी सर्व विरोधी आमदार वेलमध्ये जमा झाले होते. त्यानंतरही बोलू न दिल्यामुळे पाटील यांनी उपोषण सुरू केले. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पाटील यांची समजूत काढली. त्यानंतर पाटील यांना बोलू देण्यात आले. सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने चालत नसल्याचा टीका त्यांनी तेव्हा केली. पीठासीन अध्यक्षांना कोणी तरी सूचना करते आणि त्यानुसार ते कामकाज करतात, असा आरोप पाटील यांनी या वेळी केला. अशा पद्धतीने वागणे लोकशाहीला मारक असल्याचे ते म्हणाले.

संबंधित लेख