विद्यापीठ कायदा सर्वसमावेशक करावा – आ. संग्राम जगताप

19 Apr 2016 , 09:48:25 PM

प्रस्तावित विद्यापीठ कायदा हा सर्वसमावेशक असावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. विद्यापीठ कायद्यामध्ये कुलगुरूंना अमर्याद अधिकार दिले जाऊ नयेत, तसेच शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेप थांबवला जावा या आणि अन्य मागण्यांसाठी जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्रम कोते पाटील, महापौर अभिषेक कळमकर, महापालिकेचे सभागृह नेते कुमार वाकळे, राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष वैभव ढाकणे आणि अवधुत कासार यावेळी उपस्थित होते. 


विद्यापीठ कायद्यातून सर्वात जास्त विचार हा विद्यार्थ्यांचाच केला जावा, त्यांना संरक्षण मिळावे अशी मागणी जगताप यांनी केली. शिक्षणाचे भगवीकरण करू नये असेही जगताप यावेळी म्हणाले. विद्यापीठ कायद्यातील जाचक अटींविरोधात राज्यभर आंदोलन उभारू, असा इशारा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी दिला आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. संबंधित लेख