पाटोदा ग्रामस्थांच्या जिद्दीला सलाम - खा. सुप्रिया सुळे

23 Apr 2016 , 08:55:13 PM

पाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढले. सर्व मतभेद विसरून सर्व जातिधर्माचे, सर्व पक्षाचे लोक एक झालात. जर कधी कोणाबरोबर असे काम करण्याची संधी मिळाली तर तुमच्याबरोबर काम करेन. कारण तुम्ही खरे आहात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
सत्तेपेक्षा प्रेम महत्वाचे आहे. तेच तुमच्याकडून मिळाले. पवार साहेबांसारखी तुमची ही जिद्द आहे. त्यामुळे त्यांना तुमच्या भेटीसाठी नक्की घेऊन येईन, असेही त्या या वेळी म्हणाल्या.

यावेळी सुळे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, नंदकिशोर मुंदडा, नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, आशा भिसे, अनिकेत लोहीया, विक्रम काळे, निलेश राऊत, रविकांत वरपे हे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख