थकित स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्वरित मिळाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे निदर्शन

23 Apr 2016 , 09:03:09 PM

राज्यातील पाच लाख विद्यार्थ्यांच्या थकित स्कॉलरशिप राज्य सरकारने त्वरित द्याव्या, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पुणे शहर यांच्या वतीने बुधवारी  निदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शन करण्यात आले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, मेरिट धारक विद्यार्थी, आरोग्यविज्ञान, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, कृषी महाविद्यालय, नर्सिंग, मॅनेजमेंट आदी शाखांत शिकणाऱ्या पाच लाख विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थकलेली आहे. राज्य शासनाने याबाबत त्वरित कारवाई करावी, ही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि खासदार वंदना चव्हाण यांनी निदर्शनाद्वारे सरकारकडे मांडली.

याबाबत तातडीने पावले उचलण्यात आली नाहीत तर संंबंधित आंदोलन राज्यभर करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

संबंधित लेख