कांद्याच्या हमीभाव मिळावा यासाठी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर

06 May 2016 , 11:03:37 PM

युती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पगार यांनी दिला आहे. निर्यात मुल्य शून्य असताना देखील निर्यात धोरणांबाबत मोदी सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच भारतीय कांद्याला मागणी कमी झाली असल्याचा आरोप पगार यांनी यावेळी केला. मोदी सरकारने कांदा खरेदी करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे आहे. सरकारने कांदा हमीभाव जाहीर केल्यानंतर खरेदी केला असता तरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता. बाजार भावाप्रमाणे कांदा खरेदी करून सरकारला काय साध्य करायचे होते हा गहन प्रश्न आहे. केवळ व्यापाऱ्यांना “अच्छे दिन” यावेत म्हणूनच बाजार भावानुसार कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची टीका देखील यावेळी पगार यांनी केली.       

शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

या रास्ता रोको आंदोलनात रविंद्र पगार यांच्यासह आमदार नरहरी झिरवाळ, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, पक्ष निरीक्षक सोमनाथ बोराडे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनिल देशमुख, पंचायत समितीचे सभापती अलका चौधरी, जिल्हा परिषद सदस्या संगिता ढगे, पंचायत समिती सदस्या जयश्री सातपुते, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, लाखलगाव येथून जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, जिल्हा बँकेचे संचालक शिवाजी चुंभळे, पंचायत समितीच्या सभापती मंदा निकम, जिल्हा परिषद सदस्या अलका साळुंके, नांदगाव येथून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी नगराध्यक्ष बाळकाका कलंत्री, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शहराध्यक्ष अरुण पाटील, मनमाडचे शहराध्यक्ष राजेंद्र पगारे, सटाणा येथून माजी आमदार संजय चव्हाण, विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, देवळा येथून जिल्हा परिषदेच्या सभापती उषाताई बच्छाव, सदस्या डॉ. भारती पवार, तालुकाध्यक्ष पंडित निकम, जिल्हा पदाधिकारी जगदीश पवार, कळवण येथून जिल्हा परिषदेचे गटनेते रविंद्र देवरे, सदस्य नितीन पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, संचालक डी. एम. गायकवाड, नगरसेवक सनिल जैन, जयेश पगार, जिल्हा पदाधिकारी नारायण हिरे, त्र्यंबकेश्वर येथून हिरामण खोसकर, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा पदाधिकारी अरुण मेढे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

संबंधित लेख