सर्व कामकाज बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा करावी - दिलीप वळसे पाटील

20 Jul 2016 , 06:52:32 PM


विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहातील सर्व कामकाज बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील यांनी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कामकाज बाजूला ठेवून याबाबत चर्चा करावी ही विरोधकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. कोपर्डी गावातील 300 मुलींनी भीतीमुळे शाळेत जाणे बंद केले आहे. राज्यात सर्वत्र भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. ते शांत करण्यासाठी व योग्य संदेश जाण्यासाठी चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कोपर्डीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनाची प्रत अजूनही मिळाली नसल्याने सरकारने याप्रकरणी नक्की काय केले ते समजण्यास कोणताच मार्ग नाही, असेही वळसे पाटील म्हणाले.

संबंधित लेख