राज्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – आ. विक्रम काळे

26 Jul 2016 , 05:57:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकार ज्या ज्या वेळी नवा वेतन आयोग आणेल त्या त्या वेळी राज्यातही तो राबवला जाईल, असा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याचपद्धतीने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर राज्यानेही शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आ. विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली.

यावर उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच आम्हीही निर्णय घेऊ, असे आश्वासन सभागृहात दिले. मात्र केंद्राने अजून या निर्णयाचे नोटिफिकेशन काढलेले नाही. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी नोटिफिकेशन निघेल, त्यावेळी राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर वेतन आयोग लागू करण्याआधी शिक्षक आणि इतर कर्मचारी संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, ही आ. विक्रम काळे यांची मागणीही त्यांनी मान्य केली.

संबंधित लेख